झोडगे अपडेट


*आजचे कीर्तन -
श्री . ह भ प भाईदास महाराज -देवगव ता. पारोळा जि. नाशिक
वेळ - रात्री ९ ते ११
स्थळ : श्री विठ्ठल मंदिर ,झोडगे ,ता . मालेगाव जि. नाशिक

----------------------------------------------------------------------------------




* अखंड हरिनाम सप्ताहा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण *
प्रारंभ : श्रावण शु . १ ,रविवार ,दि . ३१-७-२०११ ते श्रावण शु . ८ ,रविवार ,दि . ७-८-२०११
स्थळ : श्री विठ्ठल मंदिर ,झोडगे ,ता . मालेगाव जि. नाशिक
*दैनंदिन कार्यक्रम *
पहाटे-४ ते ६ काकडा आरती , सकाळी ८ टीआर ११ व दुपारी २ ते ४ ज्ञानेश्वरी पारायण ,संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तन
३१-७-११ -बलाकृशन महाराज
१-८-११ - श्री भाईदास महाराज
२-८-११-श्री समाधान महाराज
३-८-११-श्री कोल्हे महाराज
४-८-११ श्री संजय महाराज
५-८-११- श्री भारत महाराज
६-८-११- श्री सावता महाराज
७-८-११- सकाळी १० -काकडा आरती ,दुपारी -१२ ते ६ महाप्रसाद (भंडारा ) ,रात्री -८ वा "श्री पांडुरंग पालखी सोहळा "
व्यासपीठ नेतृत्व :ह.भ. प. सी ज्ञनेश्वर महाराज
आयोजक : श्री विठ्ठल भजनी मंडल ,ट्रस्ट ,ग्रामस्थ ,पंचक्रोशीतील भजनी मंडल








--------------------------------------------------------------------------------------------

#झोडगे येथे पोलिसांकडून पत्रकारांना मारहाण#

मालेगाव, दि.29 (प्रतिनिधी)- झोडगे येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी परमानंद देशपांडे, दै. देशदूतचे विजय शेवाळे, गावकरीचे तुषार देसले या तिघा पत्रकारांना ते वृत्तांकन करीत असताना बाहेरगावाहून आलेल्या पोलिसांनी बेदम मारहाण केली. स्थानिक पोलिसांनी ते पत्रकार आहेत मारहाण करू नका, असे सांगितल्यानंतर या पत्रकारांची मुक्तता करण्यात आली. ट्रक जळाल्यानंतर मालेगावहून आलेल्या अतिरिक्त कुमकमधील पोलीस अंगात राक्षस संचारल्यागत गावामधील निरपराध तरूणांना मारहाण करीत सुटले, पोलिसांच्या कारवाईत वृध्द व महिलाही सुटल्या नाहीत, असे सांगण्यात आले

#गायब झालेले तिघे बैल गावातच मुक्तपणे फिरत होते#

मालेगाव, दि.29 (प्रतिनिधी)- ट्रकला आग लावल्यानंतर पाच बैल पोलिसांनी उतरवून घेतले होते. यापैकी दोन बैल बांधले होते. तर तिन बैल गर्दीचा फायदा घेवून पळून गेले. हे बैल गावातच फिरत असल्याची ग्रामस्थांनी दै. पुण्यनगरीला माहिती दिली. पोलीस म्हणता बैल चोरीला गेले आहे, अशी ग्रामस्थांना पृच्छा करताच ते म्हणाले साहेब हडकुळे बैल घेवून आम्ही काय करू पोलिसांनीच बैल सोडून दिले. हे बैल आजही गावात मुक्तपणे फिरत आहेत. आम्ही पोलिसांना पकडून दिले तर तेच आम्हालाच चोर ठरवतील म्हणून आम्ही या भानगडीत पडत नाही. पोलीस आजही या बैलाना घेवूनजावू शकतात

_____________________________________________________________


#झोडगेत दहशतीचे वातावरण#

वरील घटनेनंतर पुण्यनगरीच्या मालेगाव प्रतिनिधीने झोडगे गावाला भेट दिली असता संपूर्ण गावामध्ये पोलीस कारवाईच्या विरोधात संतप्त भावना दिसून आली. अनेक व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळल्याचे दिसत होते. आज ग्रामपंचायतीमध्ये जि. प. सदस्य भिकन शेळके, ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक देसले, माजी सरपंच भैय्यासाहेब देसले, पोलीस उपनिरीक्षक बी. एच. लोंढे आदिंची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीला ग्रामस्थही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. काल झोडगा येथे घडलेल्या घटनेचा सर्व पक्षिय नेत्यांनी निषेध केला. घडलेली घटना वाईट असली तरी पोलीस प्रशासनाने काल रात्री व आज पहाटे झोडगे गावात जी दडपशाही अवलंबली आहे. तीचाही वरील नेत्यांनी निषेध करून निरपराध तरूणांची त्वरीत मुक्तता करावी, अशी मागणी केली. 

कालच्या घटनेसंदर्भात पोलीस उपनिरीक्षक बी. एच. लोंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जमाव इतका अनावर झाला होता. की पोलिसांना तो जुमानत नव्हता अखेर पोलीस बळ आल्यानंतर आम्हाला नाईलाजाने लाठीमार करावा लागला. जनावरे व वरील गाडी पकडण्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांना पोलिसांनीच विनंती केली होती. आणि लोकांनी सहकार्यही केले होते. परंतू गाडी पोलीस चौकीजवळ आणताच तेथे उपस्थित जमावाचा राग अनावर झाला. आणि त्यांनी गाडी पलटवून पेटवून दिली. जमावाचे हे कृत्य बरोबर नव्हते जे दोषी असेल त्यांच्यावरच आम्ही कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. 

#झोडगे ग्रामस्थांची पोलिसांविरोधात तक्रार#

सौ. रुपाली सुनिल जाधव या महिलेने पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगिते की, माझे पती जेवण करीत होते. पोलीस घरामध्ये घुसले आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता माझ्या पतीला गुरासारखे मारत सोबत नेले. शिवाजी बाजीराव मोरे या आदिवासी कार्यकर्त्याने पत्रकारांशी बोलताना आदिवासी वस्तीत घुसून रात्री पोलिसांनी आदिवासी समाजाच्या कार्यकत्र्यांना बेदम मारहाण केल्याची तक्रार केली. तेथे जमलेल्या उपस्थित ग्रामस्थांनी काल रात्री झोडगे येथे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रशेखर चौगुले यांच्यासह मालेगावातून आलेल्या पोलिसांनी व अधिकार्‍यांनी महिला व निरपराधांना बेदम मारहाण केल्याची तक्रार केली. जे आरोपी आहेत. त्यांचा पोलिसांनी तपास लावला पाहिजे होता. परंतू त्या ऐवजी निरपराधांनाच पोलिसांनी लक्ष केले, असे ग्रामस्थांनी सांगितले. झोडगे पोलीस चौकीचा असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती झाल्याचे सांगितले. झोडग्याचे पोलीस सज्जनांशी ताठरपणे वागतात तर दुर्जनांना मानाची वागणूक देतात. हप्ते गोळा करणारे पोलीस हेच तणावाला कारणीभूत असल्याचे सांगितले. बैल चोरीची तक्रार देण्यासाठी शेतकरी चौकीवर गेले तेव्हा सर्व पोलीस गायब झाले होते, अशी तक्रारही ग्रामस्थांनी केली. आज पहाटे नास्ता करणारे रोजंदारीवर काम करणारे मजूर व निरपराधांना पोलिसांनी बळजबरीने पकडून नेले, अशी तक्रार लोकांनी केली.

#जिल्हा पोलीस प्रमुखांचे शांततेचे आवाहन#

दै. पुण्यनगरीने वरील प्रकारासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख प्रविणकुमार पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झोडगे गावातील लोकांनी शांतता व संयम पाळावे, कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. झोडगे गावातील खळवाडीतून शेतकर्‍यांचे जे 11 बैल चोरीला गेले आहेत. त्याची आपर गंभीर दखल घेतली असून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे तीन पथके या बैलांचा शोध घेण्यासाठी तैनात केली आहेत. टोल नाके व जकात नाके यांचे रेकॉर्ड व सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस तपासून पाहत असून लवकरच या संदर्भात धागेदोरे हाती लागतील व आम्ही आरोपींना अटक करण्यात यशस्वी होवू, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख श्री. पडवळ यांनी व्यक्त केला. 

झोडगे गावामध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला असून रात्रीची विशेष गस्त व तपासणी मोहिम पोलिसांनी सुरू केली आहे, त्यामुळे जनतेने पोलिसांवर विश्वास ठेवावा. शेतकरी वर्गाचे चोरटय़ांकडू होणारे नुकसान थांबविण्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्हा पोलीस तत्पर होवून कामाला लागले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्री. पडवळ यांनी दिली
_____________________________________________________________________
झोडगे येथे उसळलेल्या दंगलीनंतर 
पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुरू
10 जण अटकेत ; पोलीस कारवाईचा शेतकर्‍यांकडून निषेध


(दै. पुण्यनगरी -ब्रिजमोहन शुक्ला परमानंद देशपांडे)

झोडगे, दि.29 - दोन दिवसापूर्वी झोडगे खळवाडीतून शेतकर्‍यांची 11 तगडे बैल चोरून नेल्याच्या घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये संताप निर्माण झालेला असतानाच काल पोलिसांनीच ग्रामस्थांना जनावरांचा एक ट्रक झोडग्याकडे येत आहे. पकडण्यासाठी चला असे सांगून ग्रामस्थांच्या मदतीने माल मोटर (क्र. एमएच 41, जी. 2944) हिला अडविले आणि तिला झोडगे पोलीस चौकीवर आणले. या ट्रकमध्ये पाच बैल निघाल्याने वरील बैल झोडगे येथील चोरी गेलेले बैल आहेत, असा ग्रामस्थांचा समज झाल्याने संतप्त झालेल्या उपस्थित शेतकर्‍यांनी या मालमोटारीवर तुफान दगडफेक करून तिला आग लावून दिली. या घटनेनंतर पोलिसांनी झोडगे गावामध्ये तुफानी लाठीहल्ला करून शेतकर्‍यांना पिटाळून लावले. रात्री उशिरा झोडगे गावामध्ये सशस्त्र संचलनही पोलिसांना करावे लागले. या घटनेनंतर पोलिसांनी अनेक निरपराध तरूणांची धरपकड केली. आज 10 तरूणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. रात्री उशिरा जिल्हा पोलीस प्रमुख प्रविणकुमार पडवळ यांनी झोडगे गावाला भेट देवून पाहणी केली. आणि नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल उसळलेल्या दंगलीनंतर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यचे पोलीस उपनिरीक्षक डी. एच. लोंढे यांनी तालुका पोलीस ठाण्यात अनिल सुरेश देसले व इतर 500 ते 600 लोकांच्या विरोधात काल रात्री 7.30 ते 8.30 च्या दरम्यान झोडगे दुरक्षेत्र आवारात पोलिस चौकीसमोर वरील आरोपींनी 21 हजार रुपये किंमतीचे तीन बैल चोरून नेले. तसेच दगडफेक करून पोलीस कर्मचारी व इतरांना दुखापती केल्या. तसेच जनावरे नेणारा टेम्पोट्रक (क्र. एमएच 41 - जी 2944) पलटी करून तीची डिझेल टाकी फोडून तिला पेटवून दिले. आणि 15 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून त्यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने तालुका पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 200/11 भादवी 395, 345, 353, 336, 143, 149, 427, मुंबई पोलीस कायदा कलम 37/3 चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
झोडगे येथील अनिल सुरेश देसले, ज्ञानेश्वर उत्तम मगर, अशपाक सैय्यद यासीन, अनिल रोहीदास मगर, रविंद्र उत्तम मगर, राहुल बारकु देसले, इमरान खा. अहमद शेख, खुशाल पुंडलीक शिरसाठ, बंटी मुकूंद देसले, सुनिल तोरकर या 10 लोकांना अटक केली. या सर्वाना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता सरकारी वकिलांनी वरील आरोपींकडून मुद्देमाल जप्त करायचा आहे, अशी मागणी करून पोलीस कोठडीची मागणी केली. तर बचाव पक्षाचे वकील अँड. बी. एस. शेवाळे यांनी मात्र पोलिसांनी पकडलेले लोक निरपराध आहेत. त्यांना त्वरीत जामिनावर मुक्त करावे, अशी मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.
______________________________________________________________________________
झोडगे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव
झोडगे । दि. २५ (वार्ताहर)
मनाची श्रीमंती जोपासण्यासाठी वाचन संस्कृती विद्यार्थीदशेत रुजली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी विवेक उगलमुगले यांनी केले.
झोडगे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राघोबा नथू देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रघुनाथ शिरुडे होते.
बालपणात 'श्यामची आई' सारखे पुस्तके वाचल्याने मी घडलो असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थीवर्गाचा गुणगौरव प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. शालेयस्तरावर विविध उपक्रम राबवून यश संपादन केलेल्या शिक्षकाचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमात नीळकंठ देसले यांची पंचायत समिती शिक्षण समन्वयक सदस्यपदी निवड झाल्याने संघातर्फे सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य श्रीराम बडगुजर, पंढरीनाथ पितृभक्त यांनी मनोगत व्यक्त केलीत. प्रास्ताविक अहवाल वाचन प्राचार्य शिवाजी देसाई यांनी केले.
कार्यक्रमात ईश्स्तवन व स्वागतगीत कवी कमलाकर देसले व विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमास हिंमत देसले, भालचंद्र देसले, छगन पिंगळे, पांडुरंग सोनजे, एस. वाय. देसले, गुलाबराव देसाई, शेखर देसले, प्रदीप देसले, विश्‍वासराव देसले, नथू देसले, डॉ. रवींद्र पाटील, दिनकरराव देसाई आदि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सरोज देवरे, दीपक देशमुख, जितेंद्र शिरुडे यांनी तर आभार रुपाली चव्हाण यांनी मानल


------------------------------------------------------------------------------------------------------------

कै. राघो नथू देसले यांची जयंती जनता विद्यालयात कार्यक्रम 


21 जुलै २०११ झोडगे येथे जनता विद्यालय व कानिष्ट महाविद्यालयाचे संस्थापक कै.राघो नथू देसले यांची आज जयंती असल्यामुळे झणाटा विद्यालयात कार्यक्रम आहे , आज विवेक उगलमुगले यांचा त्या निम्मीत्ताने मुलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम व गुणगौरव सोहळा साजरा होणार आहे .










___________________________________________________________


 माळमाथा पतसंस्थेला चार लाख नफा

झोडगे। दि. १९ (वार्ताहर)
येथील माळमाथा परिसर माध्यमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेस सन २0१0-२0११ या वर्षात चार लाख एक हजार नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिंदे व सचिव सुरेश अहिरे यांनी दिली. ७५ सभासद असलेल्या या पतसंस्थेत झोडगे विद्यालयासह अस्ताने, टोकडे, पाडळदे या विद्यालयातील कर्मचारी सभासद आहेत. या आर्थिक वर्षात संस्थेने सभासदांना ९.६0 टक्के प्रमाणे लाभांश वाटपाची घोषणा केली आहे. या संस्थेचा व्याजदर दहा टक्के असून, संस्थेच्या विकासासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

झोडगे। दि. 13 (वार्ताहर)मालेगाव जिल्हानिर्मितीपूर्वी झोडगे शहर तालुका करण्यात यावा व त्याचा मालेगाव जिल्ह्यात समावेश करावा, अशी मागणी येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

झोडगे हे माळमाथ्यावरील 52 खेड्यांचा केंद्रबिंदू असलेले गाव आहे. लोकसंख्या, सरकारी कार्यालये, उपलब्ध जागा, विकासात्मक कामांना वाव या सर्व दृष्टीने झोडगे तालुका करण्यास योग्य आहे. झोडगे येथील बाजारपेठ, कांदा मार्केट, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, महामार्ग ते राज्यमार्ग अशी दळणवळणाची साधने या सर्व दृष्टीने झोडगे तालुका निर्माण करण्याची गरज आहे, अशी मागणी सरपंच दीपक देसले,भय्यासाहेब देसले, पं.स. सदस्य विजय देसाई, रवींद्र मोरे, पळासदरेचे सरपंच दारासिंग तुंवर, प्रा. पिरा गर्दे, प्रा. संजय देवरे, रमेश शिंदे, गोना पाटील, शांताराम लाठर यांनी केली आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-झोडगे येथे मोफत बी बियाणे वाटप 
झोडगे । दि. 18 (वार्ताहर) राज्यशासनाच्या कृषी विभाग व कृषी मंत्रालय यांच्यातर्फे राज्यात बाजरी पिकाची उत्पादकता वृद्धिंगत व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून, या अभियानांतर्गत झोडगे येथे मोफत बाजरी बियाणे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य विजय देसाई होते.

मंडल कृषी अधिकारी संजय देवरे यांनी प्रास्ताविक केले. झोडगे विभागाचे मंडळ कृषी अधिकारी जगतसिंग राजपूत यांनी या अभियानाचे व प्रकल्पाचे उद्देश व महत्त्व व अंतर्गत पीक उत्पादनवाढीचे, तसेच सुधारित लागवड तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली. कृषी विभागाच्या विविध अनुदान योजनांची माहिती डी. एफ. पगार यांनी दिली.

उपस्थित शेतकर्‍यांना बाजरीचे आयसीटीपी 8203 या जातीचे बियाणे सरपंच नंदू ठाकरे, माजी सरपंच भय्यासाहेब देसले यांच्या हस्ते वाटप झाले. भास्कर आव्हाड, एस. एस. अंदुरे योंनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------