झोडगे:
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वसलेले "झोडगे" गाव. राष्ट्रीय महामार्ग ३ वर धुळे व मालेगाव यांच्या मधोमध हे गाव लागते. गावाचा विस्तार साधारण ५ ते ६ चौ.किमी.चा आहे. तसेच लोकसंख्या साधारण १०हजार ते १५हजार पर्यंत आहे. गावात सर्व मुलभूत सुविधांची सोय आहे तसेच दळण-वळणास पक्के रस्ते आहेत, संपर्क व दृकश्राव्य माध्यमांची देखील सोय आहे. गावात ग्रामपालिका, सरकारी ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालय,प्राथमिक शाळा ,हायस्कूल ,तसेच जुनियर व सिनिअर कॉलेज, सार्वजनिक वाचनालय,आरोग्य समिती ,सहकारी पतसंस्था, ग्राम शिक्षण समिती, दुध डेअरी ,बाजार समिती, मोबाईल सुविधा, पोस्ट यंत्रणा, स्टेट बँक,मध्यवर्ती बँक, शापिंग मॉल इ. मुलभूत सुविधा आहेत. नगर रचनेच्या दृष्टीने गावाची रचना ही पूर्वजांनी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केली होती व आजही तिचा उत्तम नमुना पहावयास मिळतो. गावाचा बाह्य विस्तार होऊन आता जुनी घरे लुप्त होऊन त्या जागी पक्क्या सिमेंटच्या दुमजली व तीन माजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच गावाच्या रहदारी साठी असलेला राष्ट्रीय महामार्ग चौपदरी झाल्यामुळे गावास शहरी रूप आले असून गावात रोजगार,दळण-वळण यांना चालना मिळाली आहे.